आयुष्य एक स्वप्न.............
What is mean by life...?? आयुष्य म्हणजे काय..?? तुम्हाला नाही पडत का हा प्रश्न..? मला मात्र हा प्रश्न रोज पडायचा. मग मी ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाला विचारू..? हाच प्रश्न आधी असायचा . मग शोधता शोधता या प्रश्नाचे उत्तर मलाच सापडलं. आयुष्य एक स्वप्न आहे. आयुष्याच्या स्वप्नात खूप काही जगायचं असत. आयुष्य मागितल्यावर मिळत नसत पण आयुष्य पाण्यासारखं जपून जगायचं असत. आपण जसे पाणी वाया जाऊ देत नाही ना ते कस काटकसरीने वापरतो. त्याचप्रमाणे आयुष्याला सुद्धा जपून जगायचं असत. आयुष्य हे आपल्याला देवानी दिलेली देणगी आहे. खरंच आपण सर्व जगभर पाहायला गेलो ना.. तर आपल्याला कळेल की लोक कश्या प्रकारे आपले आयुष्य वाया घालवत आहे.
या जगात पूर्णपेक्षा अर्धी लोकसंख्याच चांगल्याप्रकारे आयुष्य जगत आहे. आणि अर्धी लोकसंख्या मारामाऱ्या, दारू पिणे, आई वडील व पत्नीला त्रास देणे, भ्रष्टाचार अश्या प्रकारचे कृत्य करत आहे. अशी लोकही आपल्या जगात राहतात. अतिशय चांगल्या प्रकारे जर आपण आयुष्य जगलो ना तर आपले जीवन आपोआपच चांगले होईल. आता तर नवीनच प्रकार या जगात सुरु झालाय. त्याचा विचार जरी केला ना.. तर अंगाला काटे येतात. ते म्हणजे 'बलात्कार '. आजच्या या युगात मुलीचे घराबाहेर निघणे ही फार कठीण झाले आहे. मुली ह्या वडिलांच्या खूपच लाडक्या असतात. त्यांना आपण घरची लक्ष्मी मानतो ना. !!! तरीही तिच्याशी असं वागताना लाज नाही वाटत का...............
बलात्कार हा खुप मोठा गुन्हा आहे. हे माहित असतानाही हे कृत्य करण्याआधी लोक थोडापण विचार करत नाही. जो व्यक्ती असा गुन्हा करतो त्यांना असे का वाटत नाही याच जागी जर आपली - बहीण किंवा आई असती तर आपण त्याच्या सोबतपण हेच कृत्य केले असते का......????
तर नक्कीच या प्रश्नाचे उत्तर नाही असेल. नाही त्याने मुळीच असं केल नसत. असे जे लोक जगतात ना त्याच्या या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. असे जर आपण आपल्या आयुष्यात वाईट काम करून
जगत असेल ना तर माझा एक सल्ला आहे. नका जगू हे आयुष्य सोडून द्या. आयुष्याला आणि खरंच वाटत असेल की आपण जे जगतो हे चुकीचं आयुष्य जगत आहो तर नव्याने आयुष्य जगायला शिका.
या जगात आपण काही चांगलं करायला गेलो ना तर वाटेला खूप दुःख येतात.त्याला सामोरे जा. आणि आपल्याला चांगलं काही करायच असेल ना तर मात्र माझं ऐका सर्वात जास्त आई आणि बाबा या दोन व्यक्तीची सेवा आणि त्याच्यावर भरपूर प्रेम. यांची सेवा म्हणजेच खरा देव धर्मच आहे. जो व्यक्ती असं करत असेल ना तर तो व्यक्ती कधीच दुःखी राहणार नाही. किंवा त्याच्या वाटेला दुःख आलं ना तर आई वडिलांची सोबत असेल ना तर ते दुःख लवकरच दूर होईल आणि त्याच्या वाटेला दुःख कधीच येणार नाही.
खरंच आयुष्य असं म्हणता येईल की खेळच आहे आणि त्या खेळात आपल्याला दोन खेळाडू आढळतात. ते म्हणजे दुःख आणि सुख. एखादा व्यक्ति त्या दुःखांना सामोरे जातो किंवा एखादा व्यक्ती त्या दुःखांना सामोरे न जाता त्याला पूर्णपणे नष्ट करून टाकतो. त्या दुःखाला सामोरे न जाता आयुष्याला नष्ट करून टाकणे हा मार्ग योग्य नाही. असं तरी मला वाटत. तर त्या दुःखाला सामोरे जाऊन त्याला पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. आणि दुःखाला पूर्णपणे नष्ट करून सुखाला जवळ बोलावणे याला खरं आयुष्य म्हणतात.
आपण हे एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला हवी की, आयुष्य एकदाच प्राप्त होत असते आणि त्याला हसत, खेळत आणि आनंदाने जगायच असत. रोजचा दिवस असा जगायचा की दिवसालाही वाटाव की मला रोज उगवायला नक्की आवडेल. मला फक्त एवढेच सांगावस वाटत की.. आयुष्य आनंदाने जगा आणि बारकाइने जगा. आपण आयुष्य जगत असतांना आपल्यामुळे कुठल्याच व्यक्तीला आपण दुखवायला किंवा त्रास द्यायला नको. आपला कोणी कितीही राग केला तरी चालेल पण तो आपला राग करतो म्हणून आपण त्याचा राग कधीच नाही करायचा. अश्या काही गोष्टीचे भान ठेवूनच आपण आपले आयुष्य आनंदाने जगायचे.
आयुष्य एकदाच प्राप्त होते, पुन्हा नाही....
"Please remeber that life gives you only one time....."
फुलाने अपेक्षा केली का कधी
काट्या कडून आधाराची
जमिनिने कधी वाट पाहली का
आभाळाची सावलीची...................
किनाऱ्याला वाटली का कधी
भीती समुद्राच्या पाण्याची
कधी वाऱ्याने संगत धरली का
शेवटपर्यंत पोहोचण्याची.................
अशीच लढाई आहे हो आपल्या
एका जीवनाची
फक्त्त एकट्याने लढ..........
The life is most important think of the world.
0 comments